नवी दिल्ली | काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना गळाला लावून मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारला भाजपने मोठं खिंडार पाडलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार कोसळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या राजकीय उलथापालथीवर काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खरोखरच आमच्या पक्षाचं नुकसान होईल. मला नाही वाटत मध्य प्रदेशमधील आमचे सरकार टिकेल. हे सध्याचे भाजपचे राजकारण आहे. नेहमीच विरोधी सरकारचे पतन करण्याचा व त्याला अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करत असतात, असं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.
कदाचित मोदीजींनी दिलेल्या मंत्रिपदाच्या ऑफरने त्यांना भुरळ पडली असावी. आम्हाला माहित आहे की त्यांचे कुटुंबाचा अनेक दशकांपासून भाजपशी संबंध आहे. पण हे पक्षासाठी मोठं नुकसान असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया हे तरुण नेतृत्व आहे. कायम डावललं गेल्याने सिंधिया हे नाराज झाले होते. आता ते पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Adhir Ranjan Chaudhary, Congress leader in Lok Sabha: So yes it will indeed be a loss to our party and I don’t think our Govt in Madhya Pradesh will survive. This is the present-day politics of BJP, always tries to topple and destabilize opposition govts https://t.co/XkiPiEwIjO pic.twitter.com/kM7RSbZihn
— ANI (@ANI) March 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
…अन् तरूणााने जयंत पाटलांसमोर केला पत्नीला व्हिडीओ कॉल
महत्वाच्या बातम्या-
‘गो कोरोना…कोरोना गो’; रामदास आठवलेंची चीनी नागरिकांसोबत घोषणाबाजी
ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; या काँग्रेस नेत्याचं भाकित
काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा
Comments are closed.