बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला मुलंही आवडतात पण मी मुलीसोबतही लग्न करु शकते”

मुंबई | सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बाॅस. या वर्षीच्या बिग बाॅसची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर बिग बाॅस 15 सुरु झाला असून तो ओटीटीवर झळकत आहे. अशातच आता अनेक नवे चेहरे पहायला मिळत असून त्यांचे नवनवीन खुलासेही समोर येत आहेत.

सध्या बिग बाॅस 15 घरात आलेली स्पर्धक मूस जट्टानानं खुलासा केल्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात असलेल्या सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. मूसनं शोमध्ये ती बायसेक्शुअल असल्याचं कबूल सांगितलं आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

याविषयी बोलताना, मूसनं म्हटलं की, मी मुलांकडे जास्त आकर्षित होते. पण माझ्यासाठी मुलीसोबतचे संबंध देखील महत्वाचे आहेत. त्यात जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा जर माझे एका मुलीशी चांगले संबंध आहेत तर मी मुलीशी लग्न करेन.

दरम्यान, बिग बाॅसच्या घरात ती तिचं मत मांडताना दिसत असते. मूस 20 वर्षांची आहे. मूसचे आई-वडील हे पंजाबच्या मोहाली येथे राहतात. महिलांच्या हक्कांसाठी ती नेहमीच आवाज उठवते. तिचा ‘व्हायरल मूस’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता.

थोडक्यात बातम्या –

बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश

कोरोना लढ्यात आणखी एक लस उपलब्ध; आता नाकातून घेता येणार लस

“माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको पण मी बोलणार, केंद्र सरकारने…”

‘तुम्ही विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसं घालू शकता?’; उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More