Top News महाराष्ट्र मुंबई

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याने ती चांगलीच गोत्यात आली होती. शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगणामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं. मात्र अशातच कंगणाने मराठीत ट्विट केलं आहे.

यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. मला प्रचंड विरोध सहन करावा लागला, मी मोठा स्ट्रगल केला. त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो, असं कंगणाने म्हटलं आहे.

कंगणाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं वाटत असल्याचं म्हटलं होतं. यावर संजय राऊत यांनी कंगणाला धमकी देऊन मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस आपलं चंबूगबाळ आवरून जा, असं म्हटलं होतं. यावर कंगणानेही जबरदस्त प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, मी येत आहे 9 सप्टेंबरला मुंबईत, विमानतळावर येण्याआधी मी वेळ आल्यावर सांगेल बघू कोणाचा बाप आडवतो असं कंगणाने म्हटलं होतं. मात्र आता तीच कंगणा मराठीत गोडवे गावू लागली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सरकार देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात…!

आचार्य अत्रेंच्या कन्या प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

“महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा”

भारतात सर्वात जास्त विकली जाणारी ‘टाटा नेक्सॉन’ पहिली इलेक्ट्रिक गाडी!

मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या….- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या