बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते”

जळगाव | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्री पदावर बसलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाचा मुखवटा धारण केला, अशी टीका केली होती. त्यावरून आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देतं भाजपवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. शिवसेनेविरोधात बंडखोर उमेदवार देऊन भाजपने बेईमानी केली होती. पहिलं बेईमान कोण हे भाजपने तपासावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. पहिले ते बेईमान झाले नसते तर, जसं ते आज म्हणतात तसं उद्धवसाहेब बेईमान झाले नसते, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांनी भाबडा मुखवटा परिधान केला आहे. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं चुकीचं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता त्यावर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. परंतु, हा विषय एकट्या शिवसेनेचा नव्हता. सोबत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील तीन मोठ्या नेत्यांची नावे उदाहरण देखील दिली होती. त्यात त्यांनी दिवाकर रावते, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं होतं. त्यावर जळगाव लोकसभा निवडणुकाचा दाखला देत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारत-पाक सामन्याआधी ‘विराट-बाबरचं वाकयुद्ध’; विराट कोहलीचं जोरदार प्रत्युत्तर

“काही लोक गांजा मारून काम करतात, त्यांची नार्कोटेस्ट करावी”

निवडणुकीआधी भाजपला खिंडार! ‘हा’ मोठा नेता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

T-20 वर्ल्ड कपआधी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…

रक्षकच ठरला भक्षक! वडिलाने केला अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More