बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला मानला असता तर कोरोना नियंत्रणात असता”

नवी दिल्ली | देशात कोरोनाने थैमान घातलेलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेसाठी भारतातील काही राज्यांची तयारी नव्हती. त्यामुळे कोरोना रूग्णांना ऑक्सिजन मिळाला नाही तर काहींना रेमडेसिवीर इंंजेक्शन कमी पडले. आता लसीकरण चालू केलं आहे मात्र काही राज्यांना केंद्र सरकारकडून अद्यापही लस मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

नितीन गडकरी यांच्याबाबत मी दिलेला प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर चांगलं झालं असतं, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. देशातील कोरोनाचं संकट अधिक बिकट होत चाललं आहे. त्यासाठी मी प्रस्ताव दिला होता की कोरोना विरोधातील लढाईची कमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हाती द्यावी. जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला असता तर देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात असती, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

देशातील कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने एक समिती बनवली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत. आधी गृह मंत्रालय आदेश देत होतं. आता सरकारला सर्वोच्च न्यायालयाचं ऐकावं लागलं. लोकशाही देशात ही एकप्रकारे सरकारची हार आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे सोपवायला हवीत. पंतप्रधान कार्यालयावर विसंबून राहणं, हे निरुपयोगी ठरेल, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

“राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपवर टीका करतात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो”

‘कोरोना काळात राजकारण करू नका, पक्ष विसरून मदत करा’; गडकरींनी टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन आणखी वाढवला

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

“मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More