बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठरलं तर! काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई | काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं होतं. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली होती. त्यानंतर आता राजीव सातव यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाला संधी मिळणार?, असा सवाल विचारला जात होता. आता या जागेसाठी काँग्रेसकडून अधिकृत नाव जाहीर केलं आहे.

राज्यसभेच्या 6 रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या रिक्त जागेवर काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीला राज्यसभेचं तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अखेर काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

काँग्रेसने अधिकृतरित्या एक पत्रक प्रसिद्ध करत याची घोषणा केली आहे. मुकूल वासनिक, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला या नावांची देखील चर्चा रंगली होती. या रिक्त जागेसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारिख आहे.

दरम्यान, उत्कृष्ट संसदपटू म्हणून रजनी पाटील यांनी ओळख आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

रश्मी ठाकरेंच्या संपत्तीबाबत सोमय्यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

“केवळ मोदी लाटेच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही कारण…”; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More