Top News देश

नविन पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा- दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली |  सध्या व्हॉट्सअॅपनं नविन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीचा अनेकजण विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ‘नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा’, असं सागंत दिल्ली उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावलं आहे.

व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात सरकारनं ठोस भूमिका घेतली पाहिजे. नवीन पॉलिसी युझर्सच्या खासगी बाबींचं उल्लंघन करणारी आहे. व्हॉट्सअॅपकडून युझर्सच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर प्रतिबंध घालणं आवश्यक आहे, असं याचिकाकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितल होतं.

यावर व्हॉट्सअॅप एक खासगी अॅप आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा. मॅप आणि ब्राउझर वापरता ना? तेथूनही तुमचा डाटा शेअर केला जातो, असं म्हणत न्यायालयानं याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, न्यायालयानं या याचिकेवरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली असून या प्रकरणी न्यायालयानं कोणालाही नोटीस बजावलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

कलाकार म्हणून काम करताना मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते- कंगणा राणावत

‘एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही’; आपल्या मूळ गावात झालेल्या पराभावनंतर पाटलांची प्रतिक्रिया

भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी

‘घासून नाय, तर विरोधकांची ठासून’! मनसेने सेना-भाजप युतीला धूळ चारत ‘या’ ग्रामपंचायतीवर लावली विजयाची पताका

“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या