बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात राष्ट्रवादीसोबत युती करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी या युतीचा पुन्हा पुनरुच्चार केला. भाजप, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना एकत्र लढावंच लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना स्वबळावर निवडणूका लढू इच्छिणाऱ्या पक्षांबद्दल त्यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

आम्ही स्वबळावर लढू असं शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी कोणीही म्हटलेलं नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातील दोन पक्ष एकत्र आले आणि येणाऱ्या निवडणूका लढल्या तर राज्यात चमत्कार होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारेही आले नाहीत, नुसतं बोलून व डोलून काय होणार?, असं म्हणत सामनाच्या आग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको. महाराष्ट्रात रोज एक नवी समस्या उभी राहत आहे. राज्य अस्थिर व्हावे, आर्थिकदृष्ट्या कमजोर पडावे यासाठी राजकारणातील काही दुष्ट शक्ती टपून बसल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अजीर्ण झाले की ते वाईटच, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

थोडक्यात बातम्या –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी सचिनने भारतीय संघाचा दिले ‘हे’ महत्वाचे सल्ले!

“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”

‘महाराष्ट्रात पुढील एक-दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते’; आरोग्य विभागाचा इशारा

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More