Top News पुणे महाराष्ट्र

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

पुणे | पुणे पदवीधर आणि शिक्षक, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुणे पदवीधर हे भाजपचं हक्काचं असणारे मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटलं आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड तर नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर हिंमत असेल तर एकएकटे लढा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांना आव्हान केलं आहे.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालं आहे. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत पाटील यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपला धक्का; महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

‘कांदळवन जमिनीवरील हरकती-दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा’; आदित्य ठाकरेंचे आदेश

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा- अर्णब गोस्वामी

‘आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना?’; सोनिया गांधींच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या