बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”

मुंबई |  शिंदे गटामुळे होत असलेलं डॅमेज शिवसेनेकडून सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाकरेंकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. यातच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत युवासेनेची बैठक पार पडली. त्यावेळी हिम्मत असेल शिवसेनेसोबत लढण्याची ताकद असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा असंआव्हान शिंदे गटाला दिलं आहे.

मुंबईवर भाजपचा डोळा आहे. जरी मुंबईवर कोणाच डोळा असला तरी मुंबईला नजर लागू देणार नाही. राजकारण म्हणलं की लोक बदलतात, पण एक प्रश्न पडतो की या लोकांना आपण काय कमी केलं? काय कमी दिलं? शिवसेनेतून घाण बाहेर पडली. आता सर्व चांगलंच होईल, असंही या बैठकीत ते म्हणाले.

हे कोणत्याही विरोधी पक्षामुळे झालं नसून आपल्याचं लोकांमुळे झालं आहे. संदिपान भुमरे,प्रकाश आबिटकर यांना पद दिलं. मी स्वत: फंडही दिला. जेव्हा हिच माणसं दगा देतात तेव्हा आपल काय चुकलं? असा प्रश्न पडतो. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेते म्हणून तर चांगले आहेतच पण माणूस म्हणून सुद्धा ग्रेट आहेत अशा प्रतिक्रिया आम्हाला फोन, मॅसेजवर मिळाल्या, असं वक्तव्य त्यांनी बैठकीत केलं.

गुवाहाटीत आमदारांच्या हाॅटेलच बील 9 लाख इतकं येत आहे तर आसाममध्ये पूरपरिस्थितीत लोकांना जेवायला अन्न नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा जी फ्लोर टेस्ट होईल एक आत आणि एक बाहेर होईल. जेव्हा हे आमदार मुंबईत येतील ते चांदिवलीत उतरतील बांद्राहून येतील आणि  वरळीतूनच त्यांना जावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला. आता फ्लोर टेस्टवेळी काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

‘यावर्षी योग्य माणसाच्या हस्तेच विठ्ठलाची पूजा’; भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य

मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

एकनाथ शिंदे दारुच्या नशेत?; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More