मुंबई | आजकालच्या धावपळीच्या जगात कोणी आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाही. त्यामुळे कोणतीही सौम्य लक्षणे असल्यास आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. नंतर या लक्षणांचे गंभीर आजारात रूपांतर होते. कॅन्सरचही (Cancer) असंच काही आहे. काल म्हणजे, 27 जुलै रोजी ‘वर्ल्ड हेड अँड नेक कॅन्सर डे’ ( World Head and Neck Cancer Day) जगभरात साजरा केला जातो. डोके आणि मानेच्या कॅन्सरचे भारताही मोठे प्रमाण आहे.
जीभ, गाल, तोंड, स्वरयंत्र, थाइरॉइड (Thyroid) यावर परिणाम करणारे कॅन्सरचे घटक आहेत. काही आरोग्य मार्गदर्शक आणि डॉक्टरांच्या मते, धुम्रपान, मद्यपान, तंबाखूचे सेवन तसेच पॅपिलोमा व्हायरस ही तोंडाचा कॅन्सर होण्याची मुख्य कारणे आहेत. आणि ही सर्व कारणे अशी आहेत की यावर प्रतिबंध करणे शक्य आहे. आपण लवकरात लवकर योग्य ती काळजी घेतली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले तर कॅन्सरचा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो.
तोंडात किंवा घशात जर जखम असेल आणि ती जखम लवकर बरी होत नसेल तसेच गिळताना त्रास होत असेल, मानेवर किंवा चेहऱ्यावर गाठ असेल, अंगाला वारंवार सूज येत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. कारण ही लक्षणे तोंडाच्या कॅन्सरची आहेत. अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही डॉक्टरांच्सा सल्ल्याने तपासणी करून घ्यायला हवी.
तुम्ही जर प्राथमिक टप्प्यात कॅन्सरची तपासणी करून उपचार घेतले तर, कॅन्सर बरा होतो. एचपीव्ही(HPV) लसीकरणाने विषाणुजन्य कर्करोगाचा धोका टाळता येतो. तसेच तंबाखू विरोधी जनजागृती करून तंबाखू खाणे नियंत्रणात आणू शकतो. आपण या देशाचे काहीतरी देणे लागतो म्हणून आपण सर्वजणांनी तंबाखू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहीजेत.
थोडक्यात बातम्या-
राज्यात पुन्हा सत्तापालट होणार?, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
‘तू मला या जगातच का आणलंस?’; अभ्यासाला बस म्हणताच चिमुकला आईवर भडकला
अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका!
“बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आलात म्हणून काय तुम्ही राजा झालात का?”
एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरमुळे नवरा विकी कौशलवर भडकली कतरिना कैफ!
Comments are closed.