बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खेळाडू झाला बाद, पण फलंदाज, गोलंदाजासह अंपायरही गोंधळात; पाहा व्हीडिओ

सिडनी | क्रिकेटमधील टी- 20 च्या फॉरमॅट खुप जलद असतो. प्रेक्षकांनासुद्धा टी-20 प्रकार आवडतो. अनेकवेळा या फास्ट फॉरमॅटमध्येळे अनेक वेळा समजत नाही की मैदानावर नेमक काय घडलं. त्यांनंतर मग निर्माण होते गोंधळाची परिस्थिती, असंच काहीसं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश सिरीजमध्ये घडलं आहे.

बिग बॅश लीगमध्ये रविवारी ब्रिसबेन हीट्स आणि सिडनी सिक्सर्सचे संघ आमने सामने होते. मॅचमध्ये ब्रिसबेन हीट पहिल्यांदा फलंदाजी करताना उतरली. पहिली विकेट स्वस्तात पडली. त्यानंतर क्रिस लिनने धमाकेदार फलंदाजी सुरू केली.

क्रिस लिनच्या साथीला ओपन सॅम हीटलेट पिचवर होता. मनेंटी डावाचे 8 वे षटक टाकत होता. त्या दुसऱ्या चेंडुवर सॅम हिजलेट एक क्रॉस शॉट खेळायला गेला. त्यावेळी चेंडू बॅटला न लागता किपरच्या दिशेने गेला. पण किपर जोश फिलीप तो चेंडू पकडू शकला नाही. मात्रतो चेंडू किपर फिलीपच्या पायांना लागला आणि चेंडू स्टंपला लागला.

फलंदाज बाद आहे की नाबाद हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. फलंदाज, गोलंदाज आणि अंपायरही गोंधळाच्या स्थितीत पोहचले. मग अशा बुचकळ्यात टाकणाऱ्या परिस्थितीतून तंत्रज्ञानानं बाहेर काढलं. निर्णय गेला तिसऱ्या अंपायरकडे. रिप्ले पाहिल्यावर लक्षात आलं की, किपरच्या पायाला लागून चेंडू स्टंपला लागला त्यावेळी फलंदाजाचा पाय हवेत होता. त्याममुळे सॅम हिजलेट 10 धावा करून बाद झाला.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More