बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाप्पासोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन, लक्षात आल्यानंतर….

वसई | राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. गणेशभक्त आपल्या श्रद्धेनुसार या काळात दीड दिवस, पाच दिवस किंवा अकरा दिवसांचा गणपती बाप्पाची आराधना करतात. वसईतील शिवसेनेचे पालघर जिल्हा सहसचिव विवेक पाटील हे पाच दिवस गणपती बाप्पाची दरवर्षी सेवा करत असतात. यावर्षी त्यांना एक वेगळाच अनुभव आला आहे.

विवेक पाटील यांना त्यांच्या काकांचा मुलगा वारल्यामुळं त्यांना सुतक पडलं होतं. त्यामुळं पाटील यांनी यावर्षी पाच दिवसाच्या गणपती ऐवजी दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा केली होती. पाटील यांनी त्यांच्या गणेशमुर्तीचं शनिवारी विसर्जन केलं. पण, गणेशमुर्तीसोबत त्यांनी साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मुकूट असलेलं बाशिंगही विसर्जन केलं. त्यानंतर सर्वत्र एकच धावपळ उडाली.

पाटील यांच्या घराजवळच लागून असलेल्या उमेळमान येथील तरूणांना सांगून मुर्तीचं विसर्जन करण्यात आलं होतं. मात्र विसर्जनानंतर कुटूंबियांना समजलं की, मुर्तीसोबत त्यांनी सोन्याचा मुकूटाचंही विसर्जन केलं. पाटील कुटूंबियांनी हे सोन्याचं मुकूट 1997 साली बनवून घेतलं होतं. तब्बल साडेतीन लाखांच्या किंमतीचं मुकूट हरवल्याने कुटूंबीय चिंतेत होते.

दरम्यान, विरारचे सदानंंद भोईर हे उत्कृष्ठ जलतरणपटू आहेत. सदानंद यांनी तलावात उतरत शोध सुरू केला. त्यानंतर खोल पाण्यात जाऊन सदानंद यांनी एका तासात सोन्याचं मुकूट बाहेर काढलं आहे. यानंतर पाटील कुटूंबियांनी गणपती बाप्पासह सदानंद भोईर यांचं आभार व्यक्त केले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

पक्षाकडून बंदी मात्र ‘राष्ट्रवादी युवक’कडून गर्दीच्या कार्यक्रमांचा धडाका सुरु

“काँग्रेसच्या माडीला पवारांचा टेकू”; दानवेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More