बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुस्टर डोसविषयी महत्त्वाची घोषणा, राजेश टोपे म्हणाले…

मुंबई | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) जगभरात खळबळ माजवली आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आज राज्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यात तुर्तास लाॅकडाऊन करण्यात येणार नसल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुस्टर डोसनविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

लसीकरण झालेले असूनही नागरिकांना कोरोनाची आणि ओमिक्राॅनची बाधा होत असल्याचं चित्र आहेे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात बुस्टर डोस (Booster Dose) देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. मात्र रुग्णसंख्या वाढतच राहिली तर तिसरी लाट येण्याती शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘ज्याला दाखवायचं आहे त्याला मी…,’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

अनाथांची माय! सिंधुताई सपकाळ अखेर अनंतात विलीन

मोठी बातमी! राज्यात तुर्तास लाॅकडाऊन लागणार नाही

अनाथांची माय! सिंधुताईंच्या अंत्यदर्शनासाठी रांगच रांग

‘मुख्यमंत्री नाही, तरीही राज्य व्यवस्थित सुरु’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More