राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी?, देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसावरून ठाकरे सरकारला घेरलं आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानं वादात आणखीन भर पडली. परिणामी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.
भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. राज्यातील परिस्थिती पाहून जनतेच्या मनातील हीच भावना आहे हे सांगताना भाजप हा लढणारा पक्ष आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
भाजप राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार नाही, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हा राज्यपालांचा असतो, असंही फडणवीस म्हणाले आहेत. भाजप संघर्ष करत मोठा झालेला पक्ष आहे, आम्ही लढत राहू, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. परिणामी राज्यात चालू असलेला गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजप नेते सोमवारी दिल्लीचा दौरा करणार आहेत. परिणामी सर्वांचं लक्ष या घडामोडींकडं लागलं आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…
रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची शेवटची खेळी?, धक्कादायक माहिती समोर
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“…तर जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे”
Comments are closed.