लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
मुंबई | कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेनंही धडक दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याचं समजत आहे.
लाखो लोकांच्या मनावर आपल्या आवाजाची छाप पाडणारी गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनंतर त्यांना तात्काळ हाॅस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं. लता मंगेशकर यांच्या डाॅक्टरांनी आता त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये असल्याचं त्यांच्या डाॅक्टरांनी सागितलं आहे. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु असून याव्यतिरिक्त काही सांगू शकत नाही. फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा, एवढंच सांगेल.
दरम्यान, 92 वर्षाच्या असलेल्या लता मंगेशकर यांना निमोनियादेखील झाला आहे. त्यांच्या वयामानानुसार त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांना अजून 10-12 दिवस हाॅस्पिटलमध्ये ठेवलं जाणार आहे.
थोडक्यात बातम्या –
पुढील 2-3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार
कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHOनं दिला मोलाचा सल्ला
बोलण्याची संधी दिली नाही म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हायरल व्हिडीओ
लसीकरणासाठी हमरीतुमरी; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
Comments are closed.