नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाझी विचारसरणीमुळे काश्मिरमध्ये आज कर्फ्युसारखी स्थिती आहे, असा निशाणा इम्रान खान यांनी साधला आहे.
जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान जगाचं लक्ष आता काश्मिर मुद्द्याकडे वेधतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी ट्वीट केलं आहे.
हिंदू श्रेष्ठ म्हणणाऱ्या आरएसएसच्या विचारधारेची मला भिती वाटते. काश्मिरमध्ये याच विचारधारेमुळे मुस्लिमांची दडपशाही सुरू आहे. म्हणून परिणामी आता पाकिस्तानला लक्ष्य केलं जात आहे, असं इम्रान खआन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या ट्वीटला भाजपचे राम माधव यांनी उत्तर दिलं आहे. जगाला भारताकडून नव्हे तर पाक पुरस्कृत जिहादी दहशतवादाचा धोका आहे, असं माधव म्हणाले आहेत.
I am afraid this RSS ideology of Hindu Supremacy, like the Nazi Aryan Supremacy, will not stop in IOK; instead it will lead to suppression of Muslims in India & eventually lead to targeting of Pakistan. The Hindu Supremacists version of Hitler’s Lebensraum.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 11, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे कृष्ण-अर्जुनाची जोडी…!”
-काॅंग्रेस सावरायला आलेल्या प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी सुरु!
-मराठा आरक्षण मिळाल्यापासून या माणसानं 13 हजार जणांना मिळवून दिली जात प्रमाणपत्रं!
-राष्ट्रवादीनं पुण्यातील नळस्टाॅप चौकाचं नाव बदललं!
-“सांगली- कोल्हापूरात अत्यंत गंभीर L3 दर्जाची आपत्ती घोषित करा”
Comments are closed.