बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aaghadi Government ) स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. कोरोना असेल किंवा आघाडी सरकारमधील नेत्यांची अंतर्गत भांडणे त्याचबरोबर सरकारमधील नेत्यांवर लावण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे हे सरकार फार काळ टीकणार नाही, अशी शंका अनेकांनी व्यक्त  केली होती. मात्र, महाविकास आघाडीने यशस्वीरित्या आपली 2 वर्ष पूर्ण केली आहेत. येत्या 28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पुर्ण होणार आहेत.

आघाडी सरकारला 2 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी अनेक प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘2024 च्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले, तर महाविकास आघाडीला 48 पैकी 45 जागा मिळतील,’ असा विश्वास व्यक्त करत पुढे, ‘2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचचं मॉडेल दिसेल यात काहीचं शंका नाही,’ असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी 2024 निवडणुकीत काँग्रेससह लढणार का? या मुद्द्यावरून त्यांनी 2024 ला काँग्रेससह महाविकास आघाडी होण्यास काहीचं अडचण नसल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, ‘आज काँग्रेसची एकच जागा आहे. जर एकत्र लढलो तर काँग्रेसलाही लाभ होईल. त्यांच्या एकच्या पाच जागा होतील,’ असं सागंत पुढे ‘मात्र प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अडीच वर्षाच्या फॉर्मुल्यानुसार उद्धव ठाकरे केवळ अडीच वर्ष मुख्यमंत्री असल्याचं बोललं जात होतं. मात्र राऊत यांनी ही शंकाही दुर केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या प्रक्रियेचा मी भाग राहिलो आहे. तेव्हाचं शरद पवारांनी राज्याचं पुर्ण वेळ नेतृत्व हे उद्धव ठाकरेचं करतील, हे स्पष्ट केलं होतं, असं त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”

“ते एक बंद षडयंत्रच होतं”, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More