बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही”

मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा आज मुंबईमधील ष्णमुखनंद सभागृहात पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधीच्या सल्ल्यावरून सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

सावरकरांनी गांधींनी सांगितल्यानं ब्रिटिशांकडे माफी मागितली हा दावा राजनाथ सिंह यांनी केला होता. त्यावर सावरकर -गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच मोहन भागवतांचे विचार त्यांनी म्हटलंय हिंदुत्व म्हणजे सर्वांचे पूर्वज एक होते, हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरुन आले होते का, असा सवाल ही उद्धव ठाकरे यांनी केला. सावरकर आणि गांधी यांच्या वादात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या माफीच्या दोन विनंत्या 1911 आणि 1913 रोजी करण्यात आल्या होत्या. तेव्हा सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. त्यावेळी गांधीची दक्षिण आफ्रिकेत होते. महात्मा गांधी यांनी 1915 मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे सावरकरांनी गांधीजींमुळे ब्रिटिशांकडे माफी मागितली, हे सर्व खोटं आहे, असं जावेद अख्तर म्हणाले

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

“सूरज सा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझको कब तक रोकोगे”

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More