Top News देश

सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या

बिहार | तरुणाला सासरवाडीला बोलावून अमाणुषपणे सासू-सासरे आणि पत्नीनं हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गया येथे घडली आहे. या प्रकरणात  तातडीनं कारवाई करत पोलिसांनी सासू-सासरे आणि पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना गुप्ता असं हत्या झालेल्या 25 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. त्याची हत्या पत्नी ज्युली कुमारी, सासरे दुर्गा साव आणि सासू संजू देवी या सर्वांनी मिळून केली.

ज्युली कुमारीचं एका व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. या विषयावरुन अनेकदा नवरा-बायकोंमध्ये भांडण आणि मारामारी व्हायची. गुरुवारी रात्री मुन्नाला ज्युलीनं तिच्या माहेरी बोलावलं. त्यावेळी घरातील सर्वांनी मिळून दोरीला त्याचे हात -पाय बांधले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या शरिरावर चाकूनं वार केले, तसंच त्याच्या डोळे, कान आणि नाकात फेविक्विक टाकल. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड होऊ नये म्हणून बाईकवरील दोन व्यक्ती एका पोत्यात मुन्नाचा मृतदेह नेत होते. परंतू गस्तीवर असणाऱ्या पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळं त्यांचा प्रयत्न फसला.

हा सर्व प्रकार 3 वर्षांच्या मुलाच्या डोळ्यासमोर सुरु होता. तसंच या प्रकरणात ज्युलीचा प्रियकर आणि अन्य एक तरुणही सहभागी होता. हे दोघं सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं”

राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, तिथं या दोन हात करु- अमित शहा

TikTok सह इतर चायनिज अ‍ॅप्सवरील बंदी कायम राहणार!

आगे आगे देखो होता है क्या- प्रसाद लाड

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या