मुंबई | मध्य प्रदेशात जे झालं तसं काही महाराष्ट्रात होणार नाही. काळजी करू नका. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी ते आज विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मध्य प्रदेशमधल्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं.
मध्य प्रदेशमधलं सरकार अजून गेलेलं नाहीये. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात अस लोकांना वाटतं. आपण बघूया दोन दिवस काय होतं, असंही ते म्हणाले.
दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी मिळ नाही, असा आरोप त्यांनी केला. यावर काँग्रेसमध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि भविष्य देखील आहे, असं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर…- संदिप देशपांडे
महत्त्वाच्या बातम्या-
मोदींच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित; भाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य यांना साक्षात्कार
काँग्रेस सोडताना माझं मन अतिशय दु:खी आहे- ज्योतिरादित्य सिंधिया
Comments are closed.