बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाद करा पण पोलार्डचा कुठं! अखेरच्या षटकात अशा प्रकारे पोलार्डने साकारला विजय, पाहा व्हिडीओ

मुंबई | मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज कायरन पोलार्डने केलेल्या स्फोटक खेळीने मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला आहे. या सामन्यात पोलार्डने यंदाच्या आयपीएलच्या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं.

मुंबई सामना गमावणार अशी परिस्थिती झाली होती मात्र संकटमोचक पोलार्डने आपला दांडपट्टा चालू केला. सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला अखेरच्या षटकात मुंबईला 14 धावांची गरज होती. त्यावेळी पोलार्ड स्ट्राईकवर होता आणि चेन्नईतर्पे लुंगी एनगीडी षटक टाकत होता.

पहिल्या चेंडू फटका मारला पण एकच धाव काढता आली असती म्हणून पोलार्डने धाव घेतली नाही. त्यानंतर पाच चेंडूत 16 धावांची गरज असताना  लुंगीने यॉर्कर टाकला मात्र तरीही पोलार्डने त्यावर चौकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवरही आणखी एक चौकार आला तर चौथ्या चेंडूवर फटका मारला मात्र त्यावेळीही पोलार्डने धाव घेतली नाही.

त्यानंतरच्या दोन चेंडूत 8 धावांची गरज होती त्यावेळी पोलार्डने एक फ्लॅट सिक्स मारला. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि अखेच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. तेव्हा दोन धावा घेतल्या यावेळी नॉन स्ट्राईकर असलेला धवल कुलकर्णीने जोरात पळत दुसरीही धाव पुर्ण केली आणि मुंबईने विजय साकार केला.

दरम्यान, पोलार्डने आक्रमक खेळी केली नसती तर मुंबई इंडियन्सने हा सामना गमावल्यात जमा होता.

 

थोडक्यात बातम्या- 

वन मॅन आर्मी! एकटा पोलार्ड चेन्नईला पडला भारी, मुंबईचा चेन्नईवर 4 गड्यांनी विजय

‘पैशासाठी आम्ही पगडी घालत नाही’; पंजाबच्या हरप्रीतचा अक्षय कुमारला टोला

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

“बड्या राजकीय हस्तींनी मला…”; लंडनला गेलेल्या अदर पुनावालांचा धक्कादायक खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More