बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रात्री घरात शिरला बिबट्या अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

बंगळुरु | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ असे असतात जे पाहताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ कर्नाटकमधील बांदीपूर येथील आहे. या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्या दबक्या पावलांमध्ये घरात शिरताना दिसत आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत, हा बिबट्या चोर पावलानं घरात शिरल्याची धक्कादायक घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

घरात प्रवेश करुन बिबट्या आजूबाजूला पाहतो, कोपऱ्यात कोण आहे का याचा अंदाज घेत तो पुढे घरात शिरत असल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या असून हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, @WildLense_India या ट्विटर अकांऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, हा व्हिडीओ बांदीपूर विंडफ्लावर येथील असल्याचा दावा केला जात आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

‘रामाची नियत खराब होती’; भाजपच्या ‘या’ आमदाराने उधळली मुक्ताफळे

‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गाईचं कल्याण हेच देशाचं कल्याण’; उच्च न्यायालयाचं मत

सांगलीच्या राजकीय आखाड्यात रंगणार दोन पाटलांची लढत!

“… तेव्हा कुठे गेलता कायदा?, आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट!”

भाजपला आंदोलन भोवलं! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More