बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई | महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते, त्यानंतर या प्रकरणावरुन चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. अजित पवार यांनी देखील या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेना आयकर विभागाच्या रडारवर आल्याचं दिसत आहे.

आयकर विभागाने (IT Department) महाराष्ट्रात धाडसत्र सुरू केलं आहे. राज्यात 24 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलं असून त्यात 25 निवासस्थानं आणि कार्यालयांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बंगळुरूमध्ये देखील हे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापेमारी सुरु आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजकीय सुडापोटी अशी छापेमारी सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी संताप देखील व्यक्त केला आहे. आयकर विभागाच्या या छापेमारीमुळे महाराष्ट्रात आता आरोप प्रत्यारोपांची धुळवड पहायला मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

‘महाविकास आघाडीतील 25 आमदार नाराज’; संजय राऊत म्हणाले…

“…तेव्हापासून भाजपला महाविकास आघाडीची भिती वाटायला लागली”

Women’s Day निमित्तानं मुंबई पोलीस महिलांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट

“त्यांचं वाटोळं होईल, त्यांना दिव्यांग मुलं जन्माला येतील”

संजय राऊतांचं थेट पंतप्रधान मोदींना 13 पानी पत्र, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More