अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

दुबई | भारत आणि अफगानिस्तानमध्ये आशिया चषकाचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. टाय झालेल्या या सामन्याचं शेवटचं षटक खूपच महत्त्वाचं होतं. या षटकात भारताला विजयासाठी 7 धावांची आवश्यक्ता होती.

भारताचे रवींद्र जडेजा आणि खलील अहमद मैदानावर होते. अफगानिस्तानचा स्टार गोलंदाज राशीद खान हे षटक टाकत होता.

पहिल्या चेंडूवर राशीदने कोणतीही धाव दिली नाही. दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चौकार ठोकला. त्यापुढील दोन्ही चेंडूवर प्रत्येकी एक धाव मिळाली त्यामुळे भारताला आता 2 चेंडूंमध्ये विजयासाठी एका धावेची आवश्यक्ता होती. षटकाच्या पाचव्या चेंडूवर मात्र रवींद्र जडेजाचा अंदाज फसला. मारलेला फटका हवेत उडाला आणि अफगानिस्तानचा क्षेत्ररक्षक नाजीबुल्लाने तो चेंडू अलगद झेलला. अशाप्रकारे सामना अनिर्णीत राहिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंदुत्वाबाबत दिलेला तो निर्णय चुकीचा होता- मनमोहन सिंग

-अंतिम सामन्यात भारताला बघून घेऊ; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांची धमकी

-सर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा- शिवसेना

-नाना पाटेकरांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं; अभिनेत्री तनुश्री दत्ताचा धक्कादायक आरोप

-अभिनेत्री काजोल चिडली; पती अजय देवगनला दिली धमकी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या