Top News

‘बायकोने बजावलंय मेव्हण्याच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज

भोपाळ | सुट्टी हवी असली की बॉसकडे अर्ज द्यावा लागतो. भोपाळपमधील एका ट्रॅफिक पोलिसाने नुकताच त्याला हव्या असलेल्या सुट्टीसाठी अर्ज केलाय. मात्र या पोलिसाने केलेला हा अर्ज सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय.

भोपाळमधील पोलिस कॉन्स्टेबल दिलीप कुमार अहिरवार यांना मेव्हण्याच्या लग्नासाठी दिवसांची सुट्टी हवी होती. यासाठी त्यांनी रजेचा अर्ज केला होता. दरम्यान या अर्जामध्ये त्यांनी एक स्पेशल नोट लिहिलीये.

11 डिसेंबर रोजी मेव्हण्याचं लग्न आहे, त्यासाठी दिवसांची रजा हवीये. जर भावाच्या लग्नाला आला नाहीत तर वाईट परिणाम होतील असं पत्नीने स्पष्टपणे बजवालं आहे, असंही त्या अर्जात नमूद करण्यात आलंय.

मात्र या अर्जावरून त्या पोलिसावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ”ही अनुशासनहीनता असून सुट्टीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. मात्र याचा अर्थ अर्जामध्ये काहीही लिहावं असं नाही,” असं भोपाळ रेंजचे डीआयजी इर्शाद वली म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार

आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज

कोरोना लसीबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट

“…तर भाजपला राज्यात 50 पेक्षा जास्त जिंकता लढवता येणार नाही”

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या