बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 99 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 37,566 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 56 हजार 994 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 907 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 97 हजार 637 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 05 लाख 52 हजार 659 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 03 कोटी 03 लाख 16 हजार 897 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 32 कोटींहुन अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंद केला आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे महापालिकेच्या प्रश्‍नांसाठी अजित पवारांची मंत्रालयात बैठक, पण महापौरांना मात्र निमंत्रणच नाही!

चक्क हवाई बेटांसारखी तीन दिवस रंगणार होती इगतपुरी रेव्ह पार्टी

“ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना लवकरच अटक होईल”

‘सुप्रिया ताईंचा ईडीवर पक्का विश्वास आहे’; भाजपची सुप्रिया सुळेंवर खोचक टीका

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More