बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या आकड्यातही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

नवी दिल्ली | देशातील कोरोना रूग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यात गेल्या 24 तासात देशातील सक्रीय बाधितांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

गेल्या 24 तासात भारतात 16 हजार 156 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 733 रुग्णांना प्राण गमवावे लागले. काल दिवसभरात देशात 17 हजार 095 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशभरात सध्या 1 लाख 60 हजार 989 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत देशभरात 04 लाख 56 हजार 386 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती. पण आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. देशाने लसीकरणात नवा विक्रम नोंद करत आतापर्यंत 103 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच लसीकरण मोहीम संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“एका ट्विटवरून गुन्हा दाखल करणारे सन्माननीय मुख्यमंत्री आता गप्प का?”

“कोणतेही दाखले काढायचे असल्यास काढून मिळतील- नवाब मलिक झेराॅक्स सेंटर”

उधारीवर एअर इंडियाचा विमान प्रवास बंद, रोख भरा आणि तिकीटं घ्या

सिग्नलच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका खर्च करणार तब्बल एवढे कोटी

“मोदी सरकारने देश अडचणीत आणलाय, वाढती महागाई अन्…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More