बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 42,640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 81 हजार 839 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 1167 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 89 हजार 302 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 06 लाख 62 हजार 521 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 99 लाख 77 हजार 861 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 28 कोटी 87 लाख 66 हजार 201 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेत जास्त व्याजदर तर मॅकडॉनल्ड्समध्ये घसघशीत सुट

ED ची मोठी कारवाई ; अविनाश भोसलेंची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता सील

“जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल,असं म्हटल्यास गैर काय?”

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

बायको मुलं भेटायला येत नसल्याने कारागृहात कैद्याचा अन्नत्याग; पोलिसांनी केला हस्तक्षेप अन्…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More