बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्याही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. पण गेल्या दोन दिवसांपासुन देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

काल देशात 54,069 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळू कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असताना कालची आकडेवारी वाढलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 68 हजार 885 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळुहळू सर्वकाही पुर्वपदावर येत असतानाच रूग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. काल देशभरात 1321 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 91 हजार 981 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 06 लाख 27 हजार 057 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 3 कोटी 82 हजार 778 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 30 कोटी 16 लाख 26 हजार 028 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुलासमोर गांजा ओढायचे इरफान खान?; व्हायरल फोटोवर बाबीलनं दिलं उत्तर, म्हणाला….

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

आंबिल ओढा परिसरातील नागरिकांना दिलासा; न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

‘उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा’; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More