बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! देशातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 15 लाखांच्या खाली

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोना च्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर 24 तासात 1 लाख 89 हजार 232 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 2677 कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 46 हजार 759 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 14 लाख 77 हजार 799 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 86 लाख 09 हजार 339 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

त्यांना कामधंदा नाही म्हणून ‘ती’ गोष्ट उकरून काढताहेत- अजित पवार

सोमवारपासून पिंपरी-चिंचवडमध्ये नवे नियम होणार लागू; काय सुरू, काय बंद? वाचा एका क्लिकवर

“…म्हणून नरेंद्र मोदींची हिटलरशी तुलना करणं अयोग्य”

“संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाही”

कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त, मी रोज करते तुम्ही पण करा- हेमा मालिनी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More