बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटसेनेने रचला इतिहास! तब्बल 50 वर्षांनंतर केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 367 धावांचं आव्हान इंग्लंडच्या संघाला पार करता आलं नाही. हा सामना जिंकताच भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता ही मालिका जिंकण्याची भारताला मोठी संधी मिळाली आहे. त्याचबरोबर भारताने तब्बल 50 वर्षानंतर ओवलच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला आहे.

इंग्लंडने टाॅस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाज फेल ठरले. कर्णधार विराट कोहली आणि शार्दुल ठाकूरने अनुक्रमे 50 आणि 57 धावा केल्या मात्र इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर भारताने दिलेल्या 192 धावांचं आव्हान इंग्लंडने आरामात पार केलं आणि पहिल्या डावात 99 धावांची आघाडी घेतली.

भारताच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा याने दमदार शतक ठोकलं. त्याने 127 धावा काढल्या. तर पुजाराने 61 धावा केल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूने 60 धावा करत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने दिलेल्या 367 धावांचं आव्हान इंग्लंडच्या संघाला पार करता आलं नाही.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात धारदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ 210 धावांत डाव गुंडाळला. त्यानंतर आता भारताने हा सामना 157 धावांनी जिंकला आहे. त्याचबरोबर भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी देखील मिळवली आहे. त्यामुळे आता पुढचा सामना इंग्लंडसाठी करो किंवा मरो असा असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

जसप्रित बुमराहचं ‘शतक’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

“बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला, मुंबई महापालिकेवरही भगवा फडकणारच”

“माझा नवरा बलात्कारी नाही, त्यानं कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाही”

“जितेंद्र आव्हाड तुम्हीही आता बॅग भरा”; किरीट सोमय्यांच्या हाताला नेमकं लागलंय काय???

प्रेयसीने न सांगता लग्न उरकल्याने तरूण गेला टेकडीवर अन्….; पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More