पणजी | राहुल गांधींनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारणा केल्यामुळं प्रभावित झालेले गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. एएनआयनं याबाबत ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांचं व्यक्तिमत्व साधं असून त्यांच्या सारख्या नेत्याची देशाला गरज आहे, असं मायकल लोबो यांनी म्हटलं आहे.
गोव्याच्या जनतेसह देशातील लोकांनी राहुल गांधींचं कौतुक करावं, असंही मायकल लोबो म्हणाले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकर यांची भेट घेत ‘लवकर बरं व्हा’, अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
–YCMOUच्या पुस्तकात सावरकरांचा दहशतवादी म्हणून उल्लेख
-ममतांवर आरोप; शहांना पोहचली मानहानीची नोटीस
–पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे भारतातील कार्यक्रम बंद?
–लाथ मारत बसल्याने उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झालाय- धनंजय मुंडे
-“पर्रिकर म्हणाले, माझा काहीही संबंध नाही, मोदींनीच ‘खेळ’ केला”