बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचं पदक निश्चित! प्रमोद भगतची फायनलमध्ये सुवर्णपदकासाठी लढत

टोकियो | सध्या टोकियो मध्ये सुरू असलेल्या टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. इतिहासात कधी नव्हे ते सर्वाधिक पदकं या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात पडलेली दिसत आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 13 पदकं आपल्या नावावर केली होती. त्यातच आता भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर होण्याची शक्यता आहे.

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याने बॅडमिंटनपटू स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये जपानच्या खेळाडूचा पराभव करत त्यांने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. 21-11 आणि 21-16 अशा दोन सेटमध्ये प्रमोदने विजय मिळवला. पहिल्या डावानंतर प्रमोद फायनलमध्ये प्रवेश करेल असं वाटलं होतं.

प्रमोद भगत हा जगातील नंबर 1 क्रमांकाचा बॅडमिंटन खेळाडू आहे. पहिल्या डावात त्याने सामन्यावर पकड मिळण्याचा प्रयत्न केला. आक्रमक खेळी करत जपानच्या खेळाडूला थकवलं आणि नंतर पहिला डाव खिश्यात घातला. दुसऱ्या डावावेळी जपानच्या खेळाडूने प्रमोदला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर प्रमोदने दुसराही डाव जिंकत सामना खिश्यात घातला.

दरम्यान, आता फायनलमध्ये प्रमोदचा सामना ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूसोबत होणार आहे. हा सामना जिंकला तर भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची कमाई होऊल. त्यामुळे प्रमोदच्या सामन्याकडे संपुर्ण भारताचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नेटकऱ्यांचा खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी वाहिली ‘या’ सुपरस्टरला श्रद्धांजली

मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कोणाला? वाचा निवडणुकीपूर्वी लोकांचं मत काय

राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पुण्यात तब्बल 91 गावं कोरोनाची हाॅटस्पाॅट; ‘या’ तीन तालुक्यांना मोठा धोका

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नाट्यगृहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More