बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंदिरा गांधींना माहित होतं की त्यांची हत्या होऊ शकते, तरीही…; प्रियंका गांधीचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली |  आगामी काही काळात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी अनेक राजकीय पक्ष त्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. काॅंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांंधी यांच्याबद्दल देखील खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

आजच्याच दिवशी मला आणि माझ्या भावाला सांगितलं होतं की, बेटा जर मला काही झालं तर रडायचं नाही. त्यांना माहिती होतं की त्यांची हत्या होऊ शकते, परंतु त्या कधीच मागे हटल्या नाहीत. तुमच्या विश्वासापेक्षा जास्त या देशात, या जगात काहीच नव्हतं. तुमचा विश्वास होता आणि त्यांच्या ह्रदयात आपल्या देशाबद्दल विश्वास होता. आज जर मी तुमच्यासमोर उभी आहे. तर ही त्यांचीच शिकवण आहे, मी देखील तुमचा विश्वास कधीच तोडू शकत नाही, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

दलित, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्यासह ब्राह्मण आदी सर्व वर्गांचे शोषण करण्यात आलं आहे. योगी आदित्यनाथ हे गुरू गोरखनाथ यांच्या शिकवणीच्या विरूद्ध सरकार चालवत आहेत. हे सरकार दररोज लोकांवर हल्ले करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीसाठी सध्या सगळ्याच पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये जाहीर सभांचा धुमधडाका लावला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उत्तर प्रदेशमध्ये मागील काही दिवसात जाहिर सभा घेतली होती.

थोडक्यात बातम्या-

परमबीर सिंह कुठे गायब आहेत?, ‘या’ नेत्याने दिलं उत्तर

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला, गंभीर आरोप करत म्हणाले…

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

एमआयएममध्ये फूट?, ‘त्या’ व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ

“पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More