मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या शिवसेनेच्या गळाला???

यवतमाळ | राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती सुरूच असून मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांच्यानंतर राष्ट्रवादीला विदर्भात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार हा राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जातो. मात्र या विधानसभेला इंद्रनील यांनी राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, इंद्रनील नाईक यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जातोय. यामुळे नाईक घराण्याच्या रूपाने राष्ट्रवादीला मोठ भगदाड पडणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ईडी, आयकर विभाग मोदींच्या तालावार नाचतात- राजू शेट्टी

-राष्ट्रवादीला नको होतं तेच घडलं, चित्रा वाघ यांनी उचललं हे मोठं पाऊल!

-भाजप पक्ष नाही तर बकासूर आहे; बाळासाहेब थोरातांची जहरी टीका

-माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण…- अजित पवार

-कर्नाटकात अखेर कमळ फुललं! येडीयुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ