बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका नाही; एम्सचे संचालक म्हणतात…

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच भारतात कोरोनाची तिसरी लाटही येणार असल्याचे तज्ज्ञांनी बोलून दाखवले आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासंबंधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त प्रभावित झाली नाहीत त्याचबरोबर तिसऱ्या लाटेमध्येही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असं वाटत नाही, असं मत व्यक्त केलं आहे. यामुळे घरात लहान मुले असणाऱ्या पालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात प्रौढांना संसर्ग झाला लहान मुलांवर त्याचा प्रभाव तेवढ्या प्रमाणात होऊ शकला नाही. त्यामुळे तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. अशी शक्यता ज्यांनी मुलांबद्दल हे सांगितलं त्यांनी व्यक्त केली आहे. अद्याप त्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असंही डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बोलताना म्हटलं आहे.

लहान मुलांना तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत किंवा तसं अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असेल असं वाटत नाही. अशाप्रकारे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मत व्यक्त केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर ब्लॅक फंगस आजारदेखील एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही, हा संसर्गजन्य आजार नाही. असं देखील रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

 पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

किंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात

20 रुपये दिले नाही म्हणून पतीची हत्या, मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो

ब्लॅक फंगस आजारावरील उपचाराबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात ‘हे’ मोठं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More