बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या संकटात आपल्या जिल्ह्यासाठी नाना पटोले यांची मोठी मदत

भंडारा | सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी लागणारी साधनसामग्री अपुरी पडताना दिसत आहे. यामुळेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यासाठी निधी दिला आहे.

कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत 50 लाख रुपये खर्च करण्याच्या सूचना भंडारा जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. या निधीतून जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, आय सी यू बेड, एन आय सी यु व्हेंटिलेटर्स, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्ससह इतर आवश्यक उपकरणे व औषधे यांची खरेदी करता येणार आहे.

कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाला सहकार्य करावं, असं आवाहन नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील जनतेला केलं आहे.

दरम्यान, कोरोना नियंत्रित करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात सरकारकडून लसीकरण मोहिम राबवली जात आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. परंतू वाढत्या रूग्णसंख्येमुळे या सुविधा अपुऱ्या पडताना दिसत आहे. भंडाऱ्यात आरोग्य सुविधा वाढवून मिळाव्यात, अशी स्थानिकांकडून मागणी केली जात होती. त्यानंतर आता नाना पटोलेंच्या या मदतीतून कोरोना रुग्णांना आधार मिळू शकतो.

थोडक्यात बातम्या-

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, देवासारखे धावून आले मात्र त्यांना हिरावून नेले!

बाप नाही हैवान… मुलीसोबत जे कृत्य केलं त्यानं सारं यवतमाळ हादरलं

आयपीएलमध्ये कुणालाही जमलं नाही ते महेंद्रसिंग धोनीनं करुन दाखवलं!

मुळशी पॅटर्नची नागपुरात पुनरावृत्ती; भर रस्त्यावर ‘लेडी डॉन’ची पळूपळून हत्या

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More