IPL 2022: CSKला मोठा धक्का! धडाधड गडी टिपणारा ‘हा’ स्टार गोलंदाज संघाबाहेर
मुंबई | जगातील सर्वात रोमांचकारी क्रिकेट लीग म्हणून प्रसिद्ध आयपीएल (IPL 2022) सध्या धमाक्यात सुरू आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम चेन्नई मात्र निराशजनक कामगिरीच्या गर्तेत अडकली आहे. अशातच आता चेन्नईसाठी धक्का देणारी माहिती समोर आली आहे.
चेन्नईची हूकमी गोलंदाज दीपक चहर जखमी असल्यानं संपूर्ण सिझन खेळू शकणार नाही. बीसीसीआयच्या निर्देशानंतर चेन्नईकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या मेगालिलावात दीपक चहरला तब्बल कोटींना खरेदी करण्यात आलं होतं.
चेन्नई संघाकडून दीपकच्या बऱ्या होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दीपक चहर दुखापतीतून बरा होण्यासाठी चेन्नईचे चाहते प्रार्थना करत आहेत. एनसीएमध्ये सरावादरम्यान चहरच्या पाठीला दुखापत झाली असून तो संपूर्ण सिझन खेळताना दिसणार नाही.
दरम्यान, मला खरंच खेळण्याची इच्छा होती पण दुर्देवानं मी यावर्षी खेळू शकणार नाही. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, असं चहर त्याच्या चाहत्यांना म्हणाला आहे.
थोडक्यात बातम्या –
हार्दिकनं केल्या दांड्या गुल! सामन्यात असं काही केलं की…लाखोंचं नुकसान झालं
गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
“…तर कारवाई केली जाईल”; रुपाली ठोंबरेंची थेट राज ठाकरेंवर टीका
…अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा माफीनामा वाचून दाखवला
“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण
Comments are closed.