IPL पुन्हा कोरोनाच्या विळख्यात, एका खेळाडूमुळे ‘ही’ संपूर्ण टीमच आयसोलेशनमध्ये
मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे असं वाटत असतानाच आयपीएलवर (IPL) मात्र कोरोनाचं सावट कायम आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनचे 53 सामने झाले असून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघातील 6 खेळाडूंना कोरोनाची (Corona) लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता दिल्लीची टीम आणखी एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. या खेळाडूचं नाव अजून समोर आलेलं नाही. मात्र, या खेळाडूच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर टीममधील इतर सहकारी खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्समधील खेळाडू दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने दिल्ली विरूद्ध चेन्नई सामन्यावर संकट आहे. तर आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआय (BCCI) व आयपीएल प्रेमींचं टेंशन वाढलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राणा दांपत्याला दिलेल्या वागणुकीवरून फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले
रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची तोफ कडाडली, म्हणाल्या…
संजय राऊतांचा ‘चवन्नीछाप’ असा उल्लेख करत रवी राणांचा हल्लाबोल
Sanjay Raut| संजय राऊतांची मोठी घोषणा, म्हणाले…
“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”
Comments are closed.