महाराष्ट्र मुंबई

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) commissioner Iqbal Singh Chahal

मुंबई | सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियम पाळत दिवाळीचे स्वागत करा, असं आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने अखेर आपला प्रभाव दाखवून दिला. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 1.06 वरून 0.41 टक्के खाली आला आहे. तर सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत 29 टक्क्यांनी घट झाली आहे, असं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलंय.

कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असले तरी यापुढेही असाच लढा सुरू ठेवा, असं इकबाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील 35.2 लाख कुटुंबांपैकी 34.2 लाख कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी पालिकेने केली, अशी माहती इकबाल सिंह चहल यांनी  दिली.

महत्वाच्या बातम्या-

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

‘कोणाच्या जिवावर माज करतात’; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल भडकल्या

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या