बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवणं पूनावालांना फायद्याचं की तोट्याचं?; पूनावाला म्हणाले…

मुंबई | कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एनडीटीव्हीच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिलं आहे.

सरकारनं आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे घेतलेला हा एक खूप चांगला निर्णय आहे. हा निर्णय फायदेशी आहे. दोन डोसमधलं अंतर वाढवणं हा एक चांगला वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला निर्णय आहे. कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती अशा दोन्ही गोष्टींच्या दृष्टीकोणातून हा निर्णय फायदेशीर असल्याचं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर सहा ते आठ आठवडे इतकं आहे. मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार हे अंतर वाढवण्यात आलं असून पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधील अंतर हे बारा ते सोळा आठवड्यांनंतर म्हणजेच तीन ते चार महिन्यांनंतर दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोविशिल्डचे दोन डोस 12 आठवड्यांच्या अंतरानं घेतल्यास ते 81.3 टक्के प्रभावी ठरतात. याशिवाय कमी कालावधीबाबतही आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, लसीचे दोन डोस सहा आठवड्यांपेक्षा कमी काळात घेतल्यास याचा प्रभाव केवळ 55.1 टक्केच होतो. दोन्ही डोसध्ये ठेवण्यात येणाऱ्या अंतरामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

थोडक्यात बातम्या- 

गडकरींची कमाल! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

लग्नाची खरेदी करताना मायलेकींना कोरोनाची लागण; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच लेकीनेही सोडले प्राण

महत्त्वाची बातमी! लसीच्या दोन डोसमध्ये असावं इतक्या दिवसांचं अंतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

कोरोनाचा ‘शक्तिमान’लाही फटका! आयसीयू बेड न मिळाल्याने मुकेश खन्नांच्या घरातील व्यक्तिचं कोरोनाने निधन

कोरोनाची नवी लक्षणं आली समोर; ‘ही’ लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More