बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचं सांगितलं होतं. एवढंच नाही तर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत पुन्हा युती करण्याबाबत मागणी केली आहे.

या सगळ्या मुद्यांना लक्षात घेऊन राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अजिबात नाही. भाजपला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांना राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच राज्याचा पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा, असं चव्हाण म्हणाले होते. त्याबाबत त्यांना विचारलं असता, काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. जर काँग्रेसची पहिल्या क्रमांकावर येण्याची इच्छा असेल तर त्यात चुकीचं काय? जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल आणि आतापर्यंत अशीच पद्धत राहिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत युती करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

गोवर लस कोरोनावर प्रभावी; पुण्यातील महाविद्यालयाचं मोठं संशोधन

“शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको”

मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल येणार जीएसटीच्या कक्षेत?; न्यायालयाने सरकारला दिला ‘हा’ आदेश

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेत जास्त व्याजदर तर मॅकडॉनल्ड्समध्ये घसघशीत सुट

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More