Top News महाराष्ट्र मुंबई

” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

मुंबई | प्रजासत्ताकदिनानिमित्त शेतकऱ्यांनी नवी दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी झालेल्या हिंसाचारावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

बळी गेले ते शेतकऱ्यांचे आणि रक्त सांडले ते पोलीस आणि जवानांचं… पण साठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?, असा सवाल शिवसेनेनं मोदी सरकारला विचारला आहे.

दिल्लीच्या रस्त्यावर जी दंडुकेशाही झाली त्याची जबाबदारी फक्त शेतकरी आंदोलकांवर टाकून चालणार नाही. जे सरकारला हवं होतं तेच घडवून आणण्यात आलं, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या घटनेनंतर सरकार आता शेतकरी आंदोलनावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

आतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…

शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात!

बायको परपुरुषासोबत पळाली; नवऱ्यानं 18 महिलांसोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य!

‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या