Top News महाराष्ट्र मुंबई

“भाजप मित्रांनाच संपवतोय याचं उदाहरण बिहारमध्ये पहायला मिळालं”

मुंबई | बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर एनडीएला विजय मिळाला. मात्र नितीश कुमार यांच्या जेडीयूपेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या असून भाजप आता एनडीएमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण बिहारमध्ये पहायला मिळालं, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे.

बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरु असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिली आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केले.

यातून बोध घेऊन नितीश कुमार जी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल, असही रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”

निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना

अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

पीडित महिलेला सरकारतर्फे दहा लाखाची मदत देणार राज्यमंत्री बच्चू कडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या