बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही- मुंबई सेशन कोर्ट

मुंबई | पत्नीची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हे बेकायदेशीर नाही, असं मुंबई सेशन कोर्टाने म्हटलंय. तसेच या प्रकरणातील आरोपी पतीचा जामीन देखील मुंबई सेशन कोर्टाने मंजूर केला आहे. 

ज्या महिलेने याबाबत तक्रार केलीय तिचं लग्न 22 नोव्हेंबर 2020 रोजी झालं होतं. लग्नाला एक महिना झाल्यानंतर तिच्या पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध बनविण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना सेशन कोर्टाने हा निकाल दिला आहे. हे कायदेशीर चौकशीचे प्रकरण नाही, असं सेशन कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी म्हटलं.

महिलेच्या पतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यादरम्यान सेशन कोर्टात सुनावणी सुरु असताना आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांनी सर्व आरोप फेटाळले. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, असं पतीने कोर्टाला सांगितलं.

तुम्हाला लकव्याचा त्रास झाला याबद्दल सहानुभूती आहे. यासाठी पती आणि त्यांच्या कुटुबियांना जबाबदार धरणं योग्य होणार नाही. म्हणून पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येतोय, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

सैफचा जहांगीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अरं थांब गड्या नको घेऊ! …अन भारताने दुसराही डीआरएस गमावला तरीही विराट पंतवरच बिघडला

राज्यात शेतजमीन खरेदी- विक्री करत असाल तर वाचा हे नियम , नियमात झाले मोठे बदल!

भारताला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू 28 व्या वर्षीच निवृत्त, आता खेळणार ‘या’ देशाकडून!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More