बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी त्यासाठी आयुष्यात कधीच खेळलो नाही’; विराट कोहलीने मांडलं रोखठोक मत

पुणे | आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत 70 शतकं केलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शतकांचा सध्या दुष्काळ सुरू आहे. गेल्या 43 खेळींमध्ये तो शतक करू शकलेला नाही. त्यावर, ‘मी कोणत्याही वैयक्तिक विक्रमासाठी बॅटिंग करत नाही,’ अशा शब्दांत विराटने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विराटने गेल्या सहा खेळींपैकी 5 वेळा अर्धशतकाची नोंद केली आहे. विराट कोहली म्हणाला, ‘मी आयुष्यात कधीही शतकांसाठी खेळलो नाही. कदाचित म्हणूनच मी इतक्या कमी कालावधीत जास्त शतकं करू शकलो असेन. टीमचा विजय महत्त्वपूर्ण आहे. जर माझं शतक झालं आणि टीम यश मिळवू शकला नाही, तर त्याचा काही उपयोग नाही, असंही तो म्हणाला.

हार्दिक पांड्याला टी-20 मालिकेत गोलंदाजी देण्यात आली मात्र, दोन्ही एकदिवसीय सामन्यांत त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. यावर विराट कोहलीने सांगितलं, की पुढचं वेळापत्रक लक्षात घेऊन हार्दिक पांड्या या अष्टपैलू खेळाडूला तंदुरुस्त राखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला. आम्हाला हार्दिकची योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्या कोणत्या कौशल्याची कुठे गरज आहे. हे ओळखून त्यानुसार निर्णय घेण्याची गरज आहे, असं कोहली म्हणाला.

दरम्यान, सुरूवातीचे आम्ही दोन खेळाडू लवकर गमावले आणि टीमला विजयासाठी चांगल्या पार्टनरशीपची गरज होती. मी आणि राहुल आम्ही मिळून ती पार्टनरशीप केली. राहुलच्या कामगिरीवर मी खूश आहे. त्यानंतर ऋषभने सामन्याचं चित्र पालटलं. आम्ही 300 रनपर्यंत पोहोचण्याचा विचार करत होतो. पण त्याहून 35 धावा अधिक करण्यात आम्ही यशस्वी झालो, असंही विराट म्हणाला.

थोडक्यात बातम्या – 

“राज्यातील ठाकरे सरकार काॅंग्रेसच्या टेकूवर उभं आहे हे लक्षात ठेवा”

“ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत”, भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

ठाकरे सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट; निलेश राणेंचा गंभीर आरोप

दिपाली चव्हाण यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याला सरकारचा झटका, केली ही कारवाई!

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More