36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांचा धुमाकूळ

Photo - Wikimedia Commons

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती आहे तर 2 अधिकारी शहीद झाल्याचं कळतंय.

पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ज्युनिअर ऑफिसर्स राहात असलेल्या ठिकाणी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. याठिकाणी 3 हजार जवान राहात असल्याची माहिती आहे. या भागात दहशतीचं वातावरण आहे.

दरम्यान, पोलिसांनी हायअलर्ट जारी केलाय. जवानांनी गोळीबार सुरु असलेल्या परिसराला घेराव घातलाय. दहशतवाद्यांना शोधण्याचं काम सुरु आहे.