बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या चोराकडून शिका’; कोरोना लस आणि इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला

मुंबई | हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात एक अजब चोरीची घटना घडली आहे. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या जवळपास शंभर डोसची चोरी केली होती. मात्र गुरुवारी या चोराने येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर चोरलेली सर्व औषधे एका चहा विक्रेत्याकडे दिली आणि ते सर्व डोस पोलिसांना देण्यास सांगितले.

या चोराने चक्क चिठ्ठी लिहित सॉरी देखील म्हटलं. सॉरी, मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे, असं चोराने या चिठ्ठीत लिहिलं होतं. या चोरट्यानं लिहिलेली ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॅग ताब्यात देवून चोर लगेच तेथून गायब झाला. नंतर तो दुकानदार ती बॅग घेऊन पोलीस ठाण्यात गेला. तेथे उपस्थित पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात कोविशिल्डचे 182 आणि कोवाक्सिनच्या 440 डोस दिसून आले. तसेच त्याच एक चिठ्ठीही आढळून आली. ज्यामध्ये असे लिहिले होते, सॉरी, मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे. या घटनेचा संदर्भ देत माणुसकी हरवलेल्यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोलाचा सल्ला दिलाय.

जंयत पाटील यांनी या चोरट्याची चिठ्ठी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. तसेच, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत जीवनरक्षक ठरणाऱ्या औषधांचा काळाबाजार करत आहेत. त्यांनी हरियाणातील या चोराकडून धडा शिकायला हवा, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“…तर राजकारणात नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”

प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे यांचं कोरोनाने निधन!

पुण्यात पुन्हा संपूर्ण कुटुंब कोरोनानं संपवलं, आई-वडिलांसह दोन भावांचा मृत्यू

सुमार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, राहुलचं दमदार अर्धशतक

सात दिवसांत कोरोना बरा करणाऱ्या ‘विराफिन’ औषधावर तात्याराव लहानेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More