बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुढची दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवू शकणार नाही”

परळी | सोमवारी परळी येथील परिसंवाद यात्रेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी परळी येथे हजेरी लावली. यावेळी जयंत पाटील यांनी ‘पुढील दहा वर्षे धनंजय मुंडे यांना निवडणुकीत कोणीही हरवू शकणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या यात्रेवरून विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.

राष्ट्रवादीच्या या परिसंवाद कार्यक्रमात तरूण कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी परळीकरांचं प्रेम पाहता पुढील दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवु शकणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

परळीच्या परिसंवाद यात्रेत थोडाफार कोरोना वाढल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा कोरोना कमी झाल्यामुळे यात्रा सुरू करण्यात येत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी जयंत पाटलांनी माझ्या लग्नालाही इतके लोक नव्हते, इतके लोक इथे स्वागतासाठी जमले आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी बारामतीचं उदाहरण बोलताना दिलं आहे. ज्याप्रमाणे बारामती शरद पवारंच्या पाठीमागे उभी राहिली तशीच साथ तुम्ही धनंजय मुंडे यांना द्या, असं म्हटलं आहे. तसेच यावेळी बारामती सारखाचं परळीचा विकास होणार असल्याचं  जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शेतात गुडघाभर पाणी आहे, नुकसान फक्त टक्केवारीत मोजू नका”

दिल्लीची दंगल अचानकपणे घडली नव्हती, तर…; दिल्ली न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

पंजाब काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

“…तर शेतकरीसुद्धा तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाहीत”

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात, तेव्हा ते आपल्या मुली…”; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More